<
Sachin Rane Hypnosis in Thane Mumbai,Hypnoclinic in Thane  Mumbai, Hypnotism Coaching in Thane Mumbai,Sachin Rane Hypnosis in Thane Mumbai.

संमोहनातून मानसोपचार

किरकोळ स्वरूपाचे सर्व मानसिक आजार हे संमोहन उपचाराने ठिक होऊ शकतात व बर्‍याच मानसिक समस्यांवर आराम मिळतो. परंतु काही लोकांनी संमोहनाबद्दल गैरसमज पसरवून त्याबद्दलची लोकांची भीती वाढवली व संमोहन हे शास्त्र भारतात लोकांपर्यंत पोहचू शकले नाही. पाहिजे त्या प्रमाणात त्याचा प्रचार व प्रसार झाला नाही.

संमोहनाच्या मदतीने थेट अंतर्मनाशी संवाद साधून अंतर्मनातील वाईट विचार व सवयी थेट बाहेर काढता येतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दैनंदिन चिंता, ताण, तणाव, काळजी यांनी विराट रूप धारण केले आहे. जर हे ताण तणाव, काळजी नियंत्रणात न आणता काम केल्यास त्यामुळे विविध किरकोळ स्वरूपाचे मानसिक आजार होतातच, मग त्याचे रूपांतर गंभीर स्वरूपाच्या आजारात होऊ शकते व मग शरीराला घातक असणार्‍या गोळ्यांचा अवलंब केला जातो.

संमोहनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून मन हे आतून बाहेरून शांत होते. मग किरकोळ स्वरूपाचे मानसिक आजार होत नाही. परंतु मग यासाठी संमोहनाची शास्त्रयुक्त माहिती असणे आवश्यक असते. ५० ते ५५ टक्के रोग हे मानसिक स्वरूपाचे असतात. या ५० ते ५५ टक्के आजारांमध्ये कोणत्याही प्रकारच्या औषधांची गरज नसते. लोक मात्र या आजारांसाठी एकतर बाबा, महाराज वा भोंदूकडे जातात व स्वत:आर्थिक व मानसिक नुकसान करून घेतात. संमोहन हे मानवी मनाच्या शक्तीचे, गूढतेचे उकल करून सांगणारे शास्त्र आहे. जगातील सर्वच पुढारलेल्या देशात मानसिक आजार, व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा, खेळ, कला, ज्ञानविज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रात संमोहनाचा वापर केला जातो.

संमोहनामुळे न्युरोसिसवर उपचार केला जातो. त्यामध्ये चिंतारोग, निराशारोग, मंत्रचाळेपणा(वारंवार हात धुणे वा कृती, विचार करणे, हिस्टेरिया, भयगंड, झोपचे विकार) मानसिक चिंतेमुळे होणारी डोकेदुखी यावर यशस्वी उपचार करता येतो. तीव्र स्वरूपाच्या मनोविकारांवर(सायकोसिस) नुसत्या संमोहन उपचाराने गुण येत नाहीत. औषधोपचार चालू असताना तीव्र विकारांमध्ये संमोहन उपचार फायदेशीर होऊ शकतो. त्याप्रमाणे मनोशारीरिक आजार, तसेच आत्मविश्वास नसणे इत्यादींवर उपचार होतो. व्यसने जसे तंबाखू, सिगारेट इत्यादीही सुटतात.यासर्व कारणांमुळे संमोहन हे एकविसाव्या शतकातील वरदानच आहे.

संमोहन हे एकविसाव्या शतकातील वरदानच आहे